उल्हासनगर पालिका भाजप अल्पगटाट

उल्हासनगर :साई पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यामुळे स्थायी समितीतील मूळच्या साई पक्षाच्या असलेल्या भाजपच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर रद्द झाले आहे. यामुळे भाजपने स्थायी समितीमधील वहुमत गमावले आहे. __ उल्हासनगर महापालिकेतील सत्ताबदल झाल्यानंतर ही स्थायी समितीमध्ये भाजपचे वहुमत असल्याने महाविकास आघाडीची कोंडी झाली होती. स्थायी समितीमध्ये भाजपचे ६ आणि साई पक्ष विलीन झाल्यामुळे त्यांवर तीन अशी भाजपची सदस्य संख्या नऊ झाली होती. १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीत भाजपचे ९ सदस्य आणि महाविकास आघाडीचे ७ सदस्य होते. वहमत भाजपकडे असल्याने महापौरपद असूनही आर्थिक निर्णय घेणे कठीण झाले होते. यावर उपाय म्हणून भाजपच्या फुटीर गटाचे नेतृत्व करणाऱ्या माजी महापौर पंचम कलानी यांनी साई पक्षाच्या शिफारशीने स्थायी समितीत आलेल्या आणि सद्या भाजपच्या गटात असलेले दिपक सिरवानी, दिप्ती दुधानी आणि ज्योती वठीजा यांचे स्थायी समिती मधील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.