येस बँकेवर निर्वध आल्यानंतर हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले असतांना अवघ्या ४८ तासांतच शनिवारी (दि. ७) स्टेट बँक ऑफ इंडियाने ४९ टक्के गुंतवणूक करण्यासह येस बँकेला उभारी । देण्यासाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला सादर केला आहे. याबाबतची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेला तीन महिन्यांसाठी १० हजार कोटींचे तातडीचे कर्ज दिले आहे. येस बँकेची अशी होणार पुनर्रचना बँकेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सध्याचेच वेतन देत किमान वर्षभर नोकरीची ग्वाही देण्यात आली आहे. नवीन सीईओंची नियुक्ती, 'सेवी ने पाठवलेले दोन संचालक, रिझर्व्ह बँकेचा प्रतिनिधी हे संचालक मंडळावर राहतील. तूर्त स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी प्रमुख वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. नवीन संचालक मंडळ त्यांच्याकडून आपल्याकडे सूत्रे हाती घेतील. पुनर्रचनेसाठी स्टेट बँक येस बँकेचे २४५ कोटी शेअर्स १० रुपये प्रतिमूल्याप्रमाणे २ हजार ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुंतवणूक ४९ टक्के असेल ज्यातून बँकेची फेरउभारणी करता येईल. मालमत्ताकराच्या माध्यमातून आर्थिक वर्षात ५ हजार कोटींचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने निश्चित केला आहे. मात्र डिसेंबर २०१९ पर्यंत अवघे १ हजार ३८७ कोटी जमा झाले होते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जास्तीतजास्त महसूल जमा करण्यासाठी पालिकेने आक्रमक धोरण स्वीकारले असून गेल्या आठवड्यापर्यंत ३ हजार १५४ रुपये कोटी एवढी रक्कम वसूल झाली होती. त्यात आणखी वाढ करण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचाही प्रस्ताव पालिकेकडे होता. गेल्या आठवड्यापासून महापालिकेने थकवाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारताच कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अनेकांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे १० कोटी असणारी दैनंदिन वसुली आता दररोज ४० ते ५० कोटींपर्यंत पोहोचली आहे. यानुसार गेल्या आठवड्याभरातच ३५० कोटी रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी महापालिकेकडे केला आहे. ही मोहीम अशीच सुरू राहिल्यास पालिका आपले उद्दिष्ट गाठेल, असे सांगण्यात येत आहे.
येस बँकेच्या पुनउँभारणीत स्टेट बँक ओतणार पैसा