महापुéषांचा अपमान करण्याचा उOT नव्हता . साबळे

_ 'चला हवा येऊ द्या' च्या संपूर्ण टीमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. या प्रकरणी निलेश सावळे आणि झी मराठी वाहिनीने माफी मागावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली होती. त्यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालक निलेश सावळे यांनी माफी मागितली आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, तो पूर्वीही नव्हता आणि भविष्यातही नसणार असे, सावळे यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात दाखण्यात आलेल्या एका दृश्याने अनेक गैरसमज झाले. ते प्रहसन वेगळे होते, त्यामध्ये तो फोटो वेगळ्या अर्थाने आणि वेगळ्या कारणाने दाखवण्यात आला होता. कोणत्याही महापुरुषांचा किंवा महान व्यक्तींचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता, तो पूर्वीही नव्हता आणि भविष्यातही नसणार. यामुळे वाद आणि गैरसमज झाले म्हणूनच मी सर्वांसमोर आलो आहे, असे निलेश साबळेंनी म्हटले आहे.